हायकू बद्दल मला अगदी थोडी माहिती आहे. तरीही उत्तर देण्याचा प्रयत्न करते. हायकू हा जपानी काव्यप्रकार आहे. फक्त तीन ओळींचाच. त्यात ही शब्दबंधन आहेच. पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसर्या ओळीत सात आणि तिसरी ओळ पुन्हा पाच शब्दांची! अशी एकूण फक्त सतरा शब्दांचीच कविता असते. हायकू ला प्रसिद्धी दिली ती 17 व्या शतकातील जपानी विचारवंत आणि कवी मात्सुयो बाशो यांनी. चिनी आणि कोरियनड भाषेतही हायकू चे प्रचलन आहे. ( जपान्यांनी त्यांच्यावर राज्य केल्याचे परिणाम म्हणून असेल). जपानी हायकू मधे पूर्वी ही शब्दांची बंधनं पाळली जात होती. शक्यतो निसर्ग वर्णन त्यातही ऋतूच्या उल्लेखाला चांगले समजले जायचे. हा काव्यप्रकार झेनमधेही थोडक्यात बरेच काही सांगण्याकरीता वापरला जायचा. आता याचा प्रसार जगभर झाल्यामुळे हायकू मधे वेगवेगळे विषयही सामावले गेले. अगदी राजकारण, समाजकारण आणि कवितांचा मुख्य विषय प्रेम व विरह सर्व विषयांवर शब्दांची बंधनं शिथिल करून हायकू केले जातात. मराठीमधे आचार्य अत्रे यांची कन्या शिरीष पै यांनी याची ओळख करून दिली. त्यांची अनेक पुस्तक ही प्रकाशित झालेली आहेत. सौजन्य: Quora.com